महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी बजरंग पाटील, तर उपाध्यक्षपदी सतिश पाटील विजयी - राष्ट्रवादी

जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन अध्यक्षपदी काँग्रेसच्या बजरंग पाटील तर उपाध्यपदी राष्ट्रवादीच्या सतिश पाटील यांची निवड झाली आहे.

विजयी उमेदवार
विजयी उमेदवार

By

Published : Jan 2, 2020, 3:23 PM IST

Updated : Jan 2, 2020, 6:41 PM IST

कोल्हापूर- जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपची सत्ता अडीच वर्षांनंतर पुन्हा हातून निघून गेली आहे. राज्याला 'आमचं ठरलंय', असा संदेश देत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत भाजपला रोखत महाविकास आघाडीने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांची निवड झाली आहे.

कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी बजरंग पाटील


अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अरुण इंगवले आणि काँग्रेसचे बजरंग पाटील आमने-सामने होते. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सतिश पाटील आणि आवाडे गटाचे राहुल आवाडे यांच्यात ही लढाई होती. यामध्ये 17 मतांनी बजरंग पाटील आणि सतीश पाटील विजयी झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा हा सलग दुसरा मोठा पराभव झाला आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप आणि मित्रपक्ष
भाजप – 14
जनसुराज्य – 6
ताराराणी आघाडी – 3
आवाडे गट – 2

भाजपच्या विजय भोजे यांना न्यायालयीन बाबीमुळे मतदानाचा अधिकार नाही

महाविकास आघाडी
शिवसेना – 10
काँग्रेस – 14
राष्ट्रवादी – 11
चंदगड युवक आघाडी – 2
स्वाभिमानी – 2
भुदरगड विकास आघाडी 2


एकूण जिल्हापरिषद सदस्य - 67
बहुमताचा आकडा- 34

महाविकास आघाडीला मिळालेली मते- 41
भाजपला मिळालेली मते- 24
एकजण गैरसहजर
एका उमेदवारास मतदानाचा अधिकार नाही

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सदस्य बेळगावहून निघाले कोल्हापूरला

Last Updated : Jan 2, 2020, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details