महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lumpy Skin Disease : आजऱ्यातील रानगव्यालाही लम्पीसदृश्य फोड; आरोग्य विभागासह वनविभाग सतर्क - Lumpy Skin Disease To Gaur In Aajara

आजरा तालुक्यामध्ये सोहाळेपैकी बाची येथील गव्याच्या अंगावर लम्पीसारखे फोड उठले ( Lumpy Skin Disease To Gaur In Aajara ) आहेत. दरम्यान तो आजारी सुद्धा आहे त्यामुळे वनविभाग सतर्क झाला ( Forest Department On Alert ) आहे.

Lumpy Skin Disease To Gaur In Aajara
गव्याच्या अंगावर लम्पीसारखे फोड

By

Published : Nov 27, 2022, 3:51 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये सोहाळेपैकी बाची येथील शेळकुंडी नावाच्या शेतात गेल्या दोन दिवसापासून रानगवा तळ ठोकून आहे. गवा आजारी असून त्याच्या अंगावर लम्पीसारखे फोड उठले ( Lumpy Skin Disease To Gaur In Aajara ) आहेत. खरंतर लम्पि हा गाय वर्गालाच आढळून आले आहेत. मात्र गाव्याला लम्पि सदृश्य फोड उठल्याने आरोग्य विभाग सुद्धा याबाबत माहिती घेत असून लवकरच याबाबत माहिती देणार आहेत. दरम्यान, गव्याला हुसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी व वनकर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून आल्याने भीतीयुक्त वातावरण पसरले ( Farmers stammer Gaur ) आहे.

गव्याच्या अंगावर लम्पीसारखे फोड

गवा दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून :सोहाळेपैकी बाची येथील बाळासाहेब दोरुगडे यांच्या शेळकुंडी, केळशेत नावाच्या शेतात गव्याने तळ ठोकला आहे. बाळासाहेब दोरुगडे यांची भात कापणी सुरु असून कापणीकरिता असलेल्या शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले. शेतकऱ्यांनी गव्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण गवा अंगावर धावून आला. वनविभागाचे वनपाल बाळेश न्हावी, सुरेश पताडे यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गव्यावर पाळत ठेवत शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना दक्षतेचे आवाहन केले. दरम्यान, गव्याच्या अंगावर लम्पिसारखे फोड उठले असून तो आजारी सुद्धा आहे त्यामुळे वनविभाग सतर्क झाला ( Forest Department On Alert ) आहे. शिवाय बफेलो वर्गाला आजपर्यंत हा आजार झाला नाहीये त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details