Lok Sabha Election: कोल्हापूर मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ६५.७० टक्के मतदान - ncp
कोेल्हापूर मतदार संघात प्रमुख लढत आघाडीचे धनंजय महाडिक आणि युतीचे संजय मंडलिक याच्यात होत आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची आहे.
Lok Sabha Election: कोल्हापुरात सकाळी ९ वाजेपर्यंत ९ .९७ टक्के मतदान
कोल्हापूर -कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात प्रमुख लढत आघाडीचे धनंजय महाडिक आणि युतीचे संजय मंडलिक यांच्यात होत आहे. ही लढत दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची असून बदललेल्या राजकीय समीकरणामुळे कोण विजयी होणार याकडे लक्ष आहे.
- ५.०० वाजेपर्यत ६५.७० टक्के मतदान
- ३.०० - वाजेपर्यत मतदारसंघात ५४.२४ टक्के मतदान
- १.०० - कोल्हापुरात ४२.४ टक्के मतदान
- ११.४५ - खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी बजावला मतदानाचा हक्क
- १२.३० - युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले मतदान
- ११.०० - कोल्हापुरात २५.४९ टक्के मतदान
- १०.३० - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क ,व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्रातील सात ही जागा निवडून येण्याचा विश्वास.
- ९.४१ - कोल्हापुरात ९ .९७ टक्के मतदान
- ९.०० - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
- ७.०० - कोल्हापूर लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात.
- ७.५० - आघाडीचे उमेदवार धंनजय महाडिक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Last Updated : Apr 23, 2019, 7:23 PM IST