कोल्हापूर - कोल्हापूरात सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत 141 प्राप्त अहवालापैकी 119 निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह झाले आहेत. तर यातील एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. अजून 10 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सोमवार अखेर एकूण 977 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 748 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 216 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
सोमवारी रात्री प्राप्त 11 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरामधील- 5, भुदरगडमधील- 1, गडहिंग्लजमधील-2 आणि इचलकरंजीमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने इचलकरंजी शहरात पुढचे 72 तास कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.