महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सरकारने केलेल्या कर्जमाफीचा कोल्हापूरमध्ये कोणालाही लाभ होणार नाही' - bjp

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीचा कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 28, 2020, 11:31 PM IST

Updated : Jan 28, 2020, 11:50 PM IST

कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये भाजपच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा... 'नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत शंका-कुशंका न बाळगता निश्चिंत रहा'

भाजपच्या या मोर्चात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनजंय महाडीक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे सहभागी झाले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया...

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत ही कर्जमाफी घाई गडबडीत करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजप सरकारने केलली कर्जमाफी सर्वसमावेशक होती. मात्र महाविकास आघाडीने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला. या कर्जमाफीचा कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'

Last Updated : Jan 28, 2020, 11:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details