महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : आजरा येथे विदेशी बनावटीच्या मद्याची तस्करी; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

आजरा गावच्या हद्दीत आजरा एस. टी. स्टॅन्डसमोर रस्त्यावर सापळा लावण्यात आला होता. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे अर्तगत छापा घालून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना पथकाने वाहनावर छापा टाकला. यात गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. त्यावर कारवाई करत सर्व बाटल्या जप्त करण्यात आल्या

विदेशी बनावटीच्या मद्यसाठ्याची तस्करी
विदेशी बनावटीच्या मद्यसाठ्याची तस्करी

By

Published : Mar 19, 2021, 6:48 AM IST

Updated : Mar 19, 2021, 8:32 AM IST

कोल्हापूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत सुमारे २० लाख ९८ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे करण्यात आली.

सापळा लावून कारवाई-

राज्य उत्पादन शुल्काचे कोल्हापूर विभागाचे यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. दरम्यान आजरा मार्गावर अवैद्य मद्याची तस्करी होणार असल्याची खबर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक व कोल्हापूर विभागाला मिळाली होती. त्यानुसार आजरा गावच्या हद्दीत आजरा एस. टी. स्टॅन्डसमोर रस्त्यावर सापळा लावण्यात आला होता. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे अर्तगत छापा घालून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना पथकाने वाहनावर छापा टाकला. यात गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. त्यावर कारवाई करत सर्व बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एक आयशर कंपनीच्या सहाचाकी ट्रक (MH-09-BC-3837) जप्त केला.

ट्रकला विशेष प्रकारचा कप्पा-

आजरा येथे विदेशी बनावटीच्या मद्याची तस्करी
या ट्रक मध्ये एक प्रकारचा कप्पा करण्यात आला आहे. बाहेरील बाजूने कोणाला निदर्शनास येत नाही. मात्र ट्रक मध्ये जाऊन बारकाईने पाहिल्यास ही बाब उघडकीस आली. त्या कारवाईत ट्रकसह २० लाख ९८ हजार ६०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी ओंकार बळीराम मुळे (वय 23 रा. वडगाव सिध्देश्वर, ता. उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून मद्याचा मुळ मालक व पुरवठादार यांचा शोध तपास गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. सदरची कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग या पथकाने केली.
Last Updated : Mar 19, 2021, 8:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details