महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाहू समूह आणि डीक्कीच्या माध्यमातून शेकडो गंगाराम कांबळे निर्माण करू - समरजितसिंह घाटगे

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बामणी येथे शाहू ग्रुप, डीक्की आणि सिड्बी यांच्या संयुक्त विद्यमाने स्टँड अप कोल्हापूर अंतर्गत स्वावलंबन संकल्प मेळावा संपन्न झाला. कागल, गडिंग्लज, आजरा, उत्तूर सह जिल्ह्यातील बाराशेहून अधिक तरुण या मेळाव्यास उपस्थित राहिले होते. जिल्ह्यातील इतक्या मोठ्या प्रमाणात दलित समाजातील तरुण उद्योजकांना आज या मेळाव्याच्या माध्यमातून नक्कीच मोठा फायदा झाला आहे. आजच्या मेळाव्याला लाभलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून डीक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी कोल्हापुरात डीक्कीचे कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही केली.

समरजितसिंह घाटगे
समरजितसिंह घाटगे

By

Published : Nov 14, 2021, 7:13 PM IST

कोल्हापूर: कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बामणी येथे शाहू ग्रुप, डीक्की आणि सिड्बी यांच्या संयुक्त विद्यमाने स्टँड अप कोल्हापूर अंतर्गत स्वावलंबन संकल्प मेळावा संपन्न झाला. कागल, गडिंग्लज, आजरा, उत्तूर सह जिल्ह्यातील बाराशेहून अधिक तरुण या मेळाव्यास उपस्थित राहिले होते. जिल्ह्यातील इतक्या मोठ्या प्रमाणात दलित समाजातील तरुण उद्योजकांना आज या मेळाव्याच्या माध्यमातून नक्कीच मोठा फायदा झाला आहे. आजच्या मेळाव्याला लाभलेला सकारात्मक प्रतिसाद पाहून डीक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी कोल्हापुरात डीक्कीचे कार्यालय सुरू करणार असल्याची घोषणाही केली. आता जिल्ह्यातील दलित समाजातील तरुणांना कोणतीही अडचण भासणार नाही. त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शाहू समूह आणि डीक्की कायम तत्पर असतील, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. शिवाय ज्या प्रमाणे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे निर्माण केले. येत्या काळात असे किमान 100 गंगाराम कांबळे निर्माण करण्याचा संकल्पही यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी व्यक्त केला.

स्टँड अप कोल्हापूर अंतर्गत स्वावलंबन संकल्प मेळावा

शाहूंच्या विचारांचा वारसा असाच सुरू ठेवणार -

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी तसेच स्वावलंबी बनण्यासाठी कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या याच विचारांचा वारसा घेऊन शाहू समूह डिक्की आणि सिड्बी दलित समाजातील तरुणांच्या व्यवसायाच्या स्वप्नांना पंख प्राप्त करून देणार आहे. शिवाय त्यांच्या पंखांना बळकटी मिळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देणार असल्याची माहितीही शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. शिवाय येत्या काळात समाजात अनेक गंगाराम कांबळे कसे बनतील यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

दलित समाजातील युवकांना त्यांच्या पायावर उभे करणे हा माझा राजधर्म आहे

यापुढे दलित समाजातील तरुण उद्योजकांच्या पाठीशी आपण कायम खंबीर उभी असणार आहोत. त्यांना कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या दारात जावे लागू नये इतके सक्षम बनवणे हे आपले स्वप्न आहे. त्यासाठी शाहू ग्रुप, राजे बँक, डिक्की आणि सिड्बीच्या माध्यमातून पाठबळ देणार आहोत. लवकरच कोल्हापूरमध्ये एक कार्यालय सुरू करणार असून दलित समाजातील युवकांना त्यांच्या पायावर उभे करणे हा माझा राजधर्म आहे. तो पाळण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असणार असल्याचेही यावेळी डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने दलित समाजातील तरुण सहभागी झाले होते.

हे ही वाचा -विरोधकांचे आव्हान गांभीर्याने घेतले पाहिजे; पण आजच्या घडीला 253 पेक्षाही अधिकांचा आपल्याला पाठिंबा - सतेज पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details