महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पन्हाळ गडावर बिबट्याचे दर्शन - कोल्हापूर बिबट्या बोतमी

सध्या लॉकडाऊनमुळे पन्हाळ गडावर पर्यटकांची संख्या कमी आहे. वर्दळ नसल्याने परिसर सध्या निर्मनुष्य आहे. मात्र, गडावर दाटवस्ती असल्याने नागरिकांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण आहे.

leopard
पन्हाळ गडावर बिबट्याचे दर्शन

By

Published : Jul 31, 2020, 3:43 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच प्रकार आज(शुक्रवार) पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागडावर पाहायला मिळाला. डॉ. राज होळकर यांच्या अंगणात बिबट्याचे दर्शन झाले. दारात असलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना कुत्रा भुंकला असताना डॉ. होळकर बाहेर आले. त्यावेळी त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.

पन्हाळ गडावर बिबट्याचे दर्शन

बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला असताना होळकर यांनी आराडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे पन्हाळ गडावर पर्यटकांची संख्या कमी आहे. वर्दळ नसल्याने परिसर सध्या निर्मनुष्य आहे. मात्र, गडावर दाटवस्ती असल्याने नागरिकांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरात तीनवेळा घरातील कुत्र्यावर बिबट्याने हल्ले केले असल्याचे डॉ. होळकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details