महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा ऋषिकेश जोंधळेंचे पार्थिव कोल्हापुरातील त्यांच्या मूळ गावी दाखल - RISHIKESH JONDHLE FUNERAL

हुतात्मा ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या मूळ गावी पोहोचले आहे. त्यांचे पार्थिव सकाळी सहा वाजता कोल्हापुरातील मराठा बटालियन येथून आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावी रवाना झाले होते. थोड्याच वेळात ऋषिकेश यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

RISHIKESH JONDHLE
ऋषिकेश जोंधळे

By

Published : Nov 16, 2020, 7:15 AM IST

Updated : Nov 16, 2020, 10:06 AM IST

कोल्हापूर- जिल्ह्याचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या मूळ गावी पोहोचले आहे. त्यांचे पार्थिव सकाळी सहा वाजता कोल्हापुरातील मराठा बटालियन येथून आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावी रवाना झाले होते. थोड्याच वेळात ऋषिकेश यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

हुतात्मा ऋषिकेश जोंधळेंचे पार्थिव कोल्हापुरातील त्यांच्या मूळ गावी दाखल
बहिरेवाडीतील भैरवनाथ हायस्कूलच्या पटांगणावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गाव प्रशासनाकडून मानवंदना देण्याची तयारी झाली आहे. अनेक गावांत फुलांच्या पायघड्या घातल्या असून अखेरचे औक्षण करण्यासाठी नागरिक जमा झाले आहेत.
हुतात्मा ऋषिकेश जोंधळेंचे पार्थिव कोल्हापुरातून त्यांच्या मूळ गावी रवाना

हेही वाचा -ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आज भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ

भारतानेसुद्धा पाकला सडेतोड उत्तर द्यावे

ऋषिकेश हे दोन वर्षापूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली. एकुलता एक असलेले ऋषिकेश यांना अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ज्या शाळेत ऋषिकेश जोंधळे शिकले, त्या शाळेच्या आवारातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

हसन मुश्रीफ यांनी जोंधळे यांच्या कुटुंबीयांचे केले होते सात्वन

ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आल्याचे समजताच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे जोंधळे यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करण्यासाठी शनिवारी (१४ नोव्हेंबर) बहिरेवाडी येथे आले होते. यावेळी, हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. शिवाय बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासियांना सार्थ अभिमान आहे. कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे, असे प्रतिपादन मुश्रीफ यांनी केले होते. तसेच, हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने जोंधळे कुटुंबीयांसाठी तीन लाखाचे अर्थसहाय्यसुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले होते.

पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये केले होते शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवार (१३ नोव्हेंबर) जम्मू काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये हुतात्मा झाला होता. भारताने देखील प्रत्युत्तर दाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाले होते. तसेच, पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली होती

Last Updated : Nov 16, 2020, 10:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details