कोल्हापूर - कोल्हापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जणांचा मृत्यू गेल्या 12 तासात झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणासुद्धा हादरून गेली आहे.
कोल्हापुरात कोरोनाचा कहर, आणखी 4 जणांचा मृत्य तर 60 जणांना लागण - कोल्हापूर कोरोना न्यूज
दिवसेंदिवस कोल्हापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. कोल्हापुरात गेल्या 24 तासात तब्बल 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जणांचा मृत्यू गेल्या 12 तासात झाला आहे.
जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी आहे. पण गेल्या आठवड्यापासून मृतांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत चालली आहे. काल (मंगळवार) रात्री 8 पासून आणखी 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 401 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 878 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 487 वर पोहोचली आहे. काल रात्रीपासून एकूण 556 जणांच्या स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 458 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 60 पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून, 38 जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत.
दरम्यान, मृतांमध्ये इचलकरंजीमधील 3 तर शहरातील 1 व्यक्तीचा समावेश आहे. यामध्ये इचलकरंजी येथील 41 वर्षांची महिला तर 75 आणि 78 वर्षांच्या वृद्धांचा समावेश आहे तर कोल्हापूर शहरातील 85 वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
आजरा- 97
भुदरगड- 81
चंदगड- 161
गडहिंग्लज- 132
गगनबावडा- 7
हातकणंगले- 35
कागल- 62
करवीर- 99
पन्हाळा- 53
राधानगरी- 75
शाहूवाडी- 193
शिरोळ- 27
नगरपरिषद क्षेत्र- 207
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-141
एकूण - 1 हजार 370
इतर जिल्हा व राज्यातील 31 असे मिळून एकूण 1 हजार 401 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 401 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 878 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 36 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 487 इतकी आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात वाढत चाललेली रुग्णांची आकडेवारी पाहता विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.