महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lakakh Army Vehicle Accident : लडाख येथे झालेल्या अपघातात कोल्हापुरातील जवानाला वीरमरण - कोल्हापुरातील जवानाला वीरमरण

लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळल्याने भीषण अपघात ( Lakakh Army Vehicle Accident ) झाला. या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील जवान प्रशांत शिवाजी जाधव ( वय 27 ) या जवानाचे निधन झाले ( kolhapur Prashant Jadhav Martyred In Assam ) आहे.

Prashant Jadhav
Prashant Jadhav

By

Published : May 28, 2022, 3:31 PM IST

कोल्हापूर -लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणारी बस श्योक नदीत कोसळल्याने भीषण अपघात ( Lakakh Army Vehicle Accident ) झाला. या अपघातात सैन्यदलातील सात जवानांना वीरमरण आले आहे. तर, अन्य जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील जवान प्रशांत शिवाजी जाधव ( वय 27 ) या जवानाचे सुद्धा निधन ( kolhapur Prashant Jadhav Martyred In Assam ) झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

बसर्गे गावातील जवान जाधव - गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे हे जवान प्रशांत शिवाजी जाधव यांचे मूळ गाव. घरी आई, वडील, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वीच 2020 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 1 वर्षांची मुलगी आहे. 2014 मध्ये ते सैन्यदलात रुजू झाले होते. सध्या ते जम्मू काश्मीर येथे रुजू होते.

मात्र, काल ( 28 मे ) लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा नदीमध्ये कोसळून अपघात झाला. यात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये प्रशांत जाधव यांचाही समावेश आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर सध्या शोककळा पसरली आहे. दरम्यान, जाधव यांचे पार्थिव विमानाने बेळगाव येथे आणले जाण्याची शक्यता आहे. तेथून जन्मगावी त्यांचे पार्थिव आणण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. शासकीय इतमामात प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा -Indian Army Vehicle Accident : सातारच्या सुभेदार विजय शिंदे यांना वीरमरण, लडाखमध्ये सैन्यदलाचे वाहन नदीत कोसळून 7 जवानांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details