कोल्हापूर - जोतिबा डोंगरावर येत्या 16 एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार ( Kolhapur Jyotiba Yatra ) आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यात्रा होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जोतिबा डोंगरावर सुद्धा स्थानिक नागरिक तसेच व्यवसायिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
श्री क्षेत्र जोतिबा येथे दरवर्षी लाखो भक्त चैत्र यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे त्याची जय्यत तयारी केली जाते. दोन वर्षांपासून यात्रा झाली नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात भक्त येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आत्तापासून तयारी सुरु करण्यात आली असून, पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil On Jyotiba Yatra ) आज ( बुधवार ) याबाबतचा आढावा घेणार आहेत.