कोल्हापूर - कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने जगातले सर्वात अवघड अष्टहजारी अन्नपूर्णा-1 शिखर सर केले आहे. 26 हजार फुटांतून अधिक उंची असलेले हे शिखर सर करणारी कस्तुरी सर्वात तरुण महिला गिर्यारोहक ठरली आहे. तिचे आता पुढचे पाऊल माऊंट एव्हरेस्ट मोहीम सर करण्याचे असल्याचे तिने म्हटले आहे.
जगातील तरुण गिर्यारोहक - अष्टहजारी अन्नपूर्णा हे शिखर खडतर एवढ्याच साठी आहे कि माऊंट एव्हरेस्टचा डेथ रेट 14 टक्के आहे. तर माऊंट अन्नपूर्णाचा डेथ रेट 34 टक्के आहे. त्यामुळेच या शिखराच्या खडतरतेची कल्पना येते. माउंट अन्नपूर्णा-1 या मोहिमेमध्ये दुर्देवाने प्रत्येक 100 पैकी 34 गिर्यारोहकांना प्राणास मुकावे लागते. माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत हजारो गिर्यारोहकांनी यशस्वी चढाया केल्या आहेत. पण उंच, अत्यंत्य दुर्गम, चढाईसाठी अतिशय अवघड असल्याने अन्नपूर्णावर आतापर्यंत फक्त 350 गिर्यारोहकच यशस्वी चढाई करू शकले आहेत.