महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marathi Bhasha Divas Kolhapur : कोल्हापूरचा 'आबा' जगभरात पोहोचवतोय कोल्हापुरी रांगडी भाषा - बघा आबा इन्टाग्राम पेज

कोल्हापुरचा आबा जगभरात पोहोचवतोय कोल्हापुरी रांगडी भाषा ( Kolhapuri Rangdi Langauge ), हे वाचल्यावर लगेचच एखादा आजोबा आहे तो आपल्या भाषेसाठी काहीतरी करतोय असंच काहीतरी सर्वात प्रथम सर्वांच्या डोक्यात आले असेल. मात्र असं नाहीये. लाखो कोल्हापूरकरांना जोडून ठेवणारे इन्स्टाग्राम या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्म वर एक 'बघा आबा' नावाचे पेज आहे. ( Bagha Aaba Instagram Page ) ज्यामाध्यमातून त्याने केवळ कोल्हापूरची रांगडी भाषा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू ठेवला आहे.

bagha aaba
बघा आबा

By

Published : Feb 27, 2022, 4:49 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरचा आबा जगभरात पोहोचवतोय कोल्हापुरी रांगडी भाषा ( Kolhapuri Rangdi Langauge ), हे वाचल्यावर लगेचच एखादा आजोबा आहे तो आपल्या भाषेसाठी काहीतरी करतोय असंच काहीतरी सर्वात प्रथम सर्वांच्या डोक्यात आले असेल. मात्र असं नाहीये. लाखो कोल्हापूरकरांना जोडून ठेवणारे इन्स्टाग्राम या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्म वर एक 'बघा आबा' नावाचे पेज आहे. ( Bagha Aaba Instagram Page ) ज्यामाध्यमातून त्याने केवळ कोल्हापूरची रांगडी भाषा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हेतू ठेवला आहे. कोण आहे हा आबा आणि कशा पद्धतीने त्याने हे पेज सुरू केले आहे पाहुयात मराठी भाषा दिनानिमिताने ईटीव्ही भारत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्टमधून. ( Marathi Bhasha Divas Kolhapur )

बघा आबा पेजच्या माध्यमातून रांगडी भाषेचा व्हिडिओ.

अशी झाली पेजची सुरुवात -

कोल्हापूरातल्या हुपरी येथील एक तरुण जो गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये नोकरी करत होता. मात्र, आपल्या कोल्हापूरच्या ठसकेबाज रांगड्या भाषेची त्याला तिथे खूपच कमी जाणवायची. म्हणूनच कोणीही कुठेही असो आपल्या कोल्हापुरी भाषेची त्याला नेहमीच आठवण असावी आणि कोल्हापूरसह ही भाषा सर्वदूर पसरावी यासाठी त्याने 'बघा आबा' नावाने इन्स्टाग्रामवर सप्टेंबर 2017 मध्ये एक पेज काढले. केवळ कोल्हापुरी मराठी रांगडी भाषा सर्वांपर्यंत पोहोचावी हाच त्याचा एकमेव हेतू आहे. यामध्ये कोल्हापूरच्या भाषेतील वाक्ये जी आपण दररोजच्या जीवनात एकमेकांशी बोलताना वापरत असतो तीच वाक्ये तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट करत असतो. त्याला लाखो लोकं लाईक्स आणि शेअर सुद्धा करतात. 1 हजार, 2 हजार करत करत आज त्याला जवळ जवळ दीड लाख लोकं फॉलो करतात. विशेष म्हणजे इतके फॉलोअर्स असूनही त्याने आपला मूळ उद्देश मात्र कधीच बाजूला ठेवला नाही. विशेष म्हणजे तो कोण आहे ही ओळख सुद्धा त्याने अध्याप उलगडलेली नाही.

बघा आबा ची 'भावा'पासून सुरुवात -

'बघा आबा"च्या या पेजवर सर्वात पहिली पोस्ट होती केवळ 'भावा'! खरंतर कोल्हापूरात अनेकांच्या तोंडात 'भावा' हा शब्द ऐकायला मिळतोच. महाराष्ट्रात सुद्धा विविध भागात विशेष पद्धतीने तसेच आवाजातील चढ उताराने तो कोणत्या भागातील आहे, हे आपण सहज ओळखू शकतो. तसेच कोल्हापुरी भाषा सुद्धा अशी भाषा आहे मग इथला माणूस जगभरात कुठेही भेटला तरी तो कोल्हापूरचा आहे हे कदाचित त्याला सांगावे लागत नाही. समोरचा त्याची भाषा पाहुनच तुम्ही कोल्हापूरचे आहात का? असा प्रश्न करत असतात. आणि म्हणूनच बघा आबाने आपल्या पेजवर पोस्ट केलेल्या केवळ 'भावा' या शब्दाला मिळालेल्या लाईक्समुळे त्याने यातून प्रेरणा घेतली. दररोज एकापेक्षा एक शब्द जे आपण रोजच बोलत असतो. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लिखित स्वरूपात लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले तेव्हा युवकांनी सुद्धा त्याला पसंती द्यायला सुरुवात केली. आज जवळपास 1 हजारच्या आसपास वेगवेगळे कोल्हापूर शब्द, वाक्ये त्याने या पेज च्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवली आहेत.

हेही वाचा -Aditya Thackeray on Marathi Bhasha Diwas : 2024 ला दिल्ली सर करणारच; मराठी भाषा गौरव दिनी मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्धार

बघा आबा पेज वरील काही हटके कोल्हापुरी वाक्यांच्या पोस्ट -

1) विषय हार्ड
2) अं हं सुट्टी नाय !
3) अग्गाया..या..या...
4) हारकेश मेंबर !
5) काय करायलंस
6) काय मर्दा...
7) सुधारायच्या गोळ्या चुकल्यात काय
8) काय नी मग, काय करताय
9) हायस का मेलास
10) नाद करा पण आमचा कुटं, अशी अनेक कोल्हापूरी भाषेतील वाक्ये जी कोल्हापूरकर दररोजच्या जीवनात वापरतात ती या पेजच्या माध्यमातून आबा दररोज शेअर करत असतो.

जनजागृती, शहरातील ठिकाणांची, चौकांच्या नावांची ऐतिहासिक माहिती -

या पेजच्या माध्यमातून त्याने जनजागृती तसेच शहरातील विविध ठिकाणांची तसेच चौकांची नावं त्यावेळी का पडली आहेत ? आणि त्यामागे काय इतिहास आहे ? याचीही माहिती गेल्या काही दिवसांपासून या पेजच्या माध्यमातून देऊ लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या फॉल्लोअर्स मध्ये वाढच होत चालली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details