कोल्हापूर- शहरासह ग्रामीण भागालाही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात, अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी, विजांच्या कडकडाटासह हजेरी लागली. गडहिंग्लज, नेसरी, आजरा आणि इचलकरंजी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे आंबा, काजू, कलिंगड पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.