कोल्हापूर - पुणे शहराच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात देखील व्यापाराची वेळ वाढवून द्यावी. व्यवसायाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कोल्हापुरातील छोट्या व्यवसायिकांनी दिला आहे. येत्या दोन दिवसात राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलनास सुरुवात होईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
'...तर कोल्हापुरातही आंदोलन पुकारण्यात येईल', व्यापाऱ्यांचा इशारा - Kolhapur traders news
पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील असहकार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कोल्हापुरातील छोट्या व्यवसायिकांनी दिला आहे.
कोल्हापूर