कोल्हापूर - शहरातील कसबावाडा येथील तीन पर्यटकांचा शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू झाला होता. या कुटुंबाचा गाडीतून प्रवास करतानाचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे तिघे जण एकाच कुटुंबातील होते.
गणपतीपुळे येथे बुडालेल्या 'त्या' पर्यटकांचा शेवटचा ठरला हा व्हिडिओ - 'tourists' drowned at Ganapatipule
कोल्हापूर शहरातील कसबावाडा येथील तीन पर्यटकांचा शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे बुडून मृत्यू झाला होता. या कुटुंबाचा गाडीतून प्रवास करतानाचा अखेरचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हे तिघे जण एकाच कुटुंबातील होते.
व्हिडीओमध्ये चालकाशेजारी बसलेले राहुल बागडे मागील सीटवरील बसलेल्या काजल मछले व सुमन मछले अशी मृतांची नावे आहेत. हे तिन्ही पर्यटक कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा हा अखेरचा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर (कसबा बावडा) येथून गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी एक कुटुंब आले होते. आज (शनिवारी) सकाळी समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. हे चौघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडू लागले. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली आणि बुडणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात एका मुलीला वाचविण्यात त्यांना यश आले आहे. सुरक्षारक्षक गुरुप्रसाद बलकटे यांनी समुद्रात रिंग टाकून या मुलीला वाचविले. या चौघांपैकी काजल मचले, सुमन विशाल मचले आणि राहुल अशोक बागडे यांचे मृतदेह सापडले आहेत.