कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी 'ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड ( Kolhapur student selected for higher studies in Australia ) झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कौशिकी जाधव हिला केंद्र सरकारची 83 लाखांची शिष्यवृत्ती ( Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship ) मिळणार आहे.
कौशिकीचे आईएलटीएस परीक्षेमध्ये यश संपादन -
दरम्यान, कौशिकीने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आईएलटीएस परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या या परिक्षेसाठी डीकेटीईमध्ये वेळोवेळी तज्ञ प्राध्यपकांचे लेक्चर आयोजन केले जात असते. यामुळे यापूर्वी सुद्धा येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा झाला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशिन टूल्स अँन्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, अॅटोमेशन, रोबोटीक्स, मशिन डिझाईन या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी तीला फायदा झालेला आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील बॉश लॅब, स्मार्ट फौड्री, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील या निवडीसाठी फायदा झालेला आहे असे तिने म्हंटले आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा, लॅब आणि संशोधनात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी चालना मिळत गेली आहे.