महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 16, 2019, 1:44 PM IST

ETV Bharat / state

कोल्हापूरच्या सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले आहे. जोतिबा गणपती चौगले असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.

kolhapur soldiers martyred militants in rajouri in jammu and kashmir
जोतिबा गणपती चौगले

कोल्हापूर -जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले आहे. कोल्हापूरच्या महागावचे जवान अतिरेक्यांच्या चकमकीत वीरगतीस प्राप्त झाल्याची घटना आज 16 डिसेंबरला घडली. जोतिबा गणपती चौगले असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते.

हेही वाचा... #CAA : जामिया विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा सुरु; शर्ट काढून करत आहेत निदर्शने

जोतिबा चौगले हे 2009 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मूमध्ये राजुरी इथे ते कार्यरत होते. आपले कर्तव्य पार पाडत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत चौगले यांना वीरमरण आले आहे. उद्या दुपारी महागाव गावात चौगले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र आणि चौगले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा... चारा छावण्यातील गैरप्रकारावर सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू - राजू शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details