महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Shivsena: कर्नाटकात मराठी भाषिकांना चांगली वागणूक मिळावी, सेनेचे राज्यपालांना निवेदन - Kolhapur Shivsena

कर्नाटकातील मराठी भाषिकांना (Marathi speakers in Karnataka) चांगली वागणूक मिळावी यासाठी शिवसेनेने कर्नाटकचे राज्यपाल (karnataka governer) थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना निवेदन दिले आहे. (kolhapur shivsena letter).

kolhapur shivsena letter to karnataka governer
सेनेचे राज्यपालांना निवेदन

By

Published : Nov 4, 2022, 5:40 PM IST

कोल्हापूर: गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमेच्या प्रश्नावरून वाद सुरू आहे. (karnataka maharashtra border issue). सध्या हा सीमावाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र असे असताना देखील कर्नाटक पोलिसांकडून वारंवार तेथील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. आता कर्नाटकातील मराठी भाषिकांना (Marathi speakers in Karnataka) चांगली वागणूक मिळावी यासाठी शिवसेनेने कर्नाटकचे राज्यपाल (karnataka governer) थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या माध्यमातून राज्यपालांकडे विविध मागण्या केल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी म्हंटले आहे.

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे

काय आहेत मागण्या:सीमा भागात मराठी साहित्य संमेलन तसेच ग्रंथ दिंडीला परवानगी मिळावी, कोणतेही आंदोलन केल्यानंतर कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो ते बंद व्हावे, बेळगाव, कारवार, निपाणी भागात काही नागरी सुविधा सुधारणेबाबत आवाज उठवला तर त्याला परवानगी मिळत नाही, लोकशाही मार्गाने आंदोलन करू दिले जात नाही. ही दडपशाही रोखण्यात यावी, 1 नोव्हेंबर दिवशी काळा दिन आणि हुतात्मा दिन पाळला जातो. त्यावेळी सीमाभागात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना कर्नाटकात बंदी घातली जाते, ते बंद व्हावे, मराठी भाषिकांच्या आंदोलनात पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही मारहाण बंद व्हावी अशा सूचना कर्नाटक पोलिसांना करण्यात याव्या. सीमा भागातील मराठी भाषिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.

सेनेचे राज्यपालांना निवेदन
सेनेचे राज्यपालांना निवेदन

ABOUT THE AUTHOR

...view details