महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्नाटक प्रशासन शिवसैनिकांसमोर नरमले, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुतळा बसवण्याची भूमिका - कर्नाटक मनगुत्ती न्यूज

कोल्हापूर व बेळगावचे जिल्हाधिकारी, दोन मंत्री, खासदार यांची बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढा, अशी मागणी शिवसेनेने केली. मनगुत्तीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. येत्या आठ दिवसात कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्नाटक सरकारने कबूल केले आहे.

कर्नाटक प्रशासन शिवसैनिकांसमोर नरमले
कर्नाटक प्रशासन शिवसैनिकांसमोर नरमले

By

Published : Aug 25, 2020, 6:56 PM IST

कोल्हापूर - कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील हटवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, या मागणीसाठी आज शिवसेना कर्नाटकात दाखल झाली होती. त्याची दखल कर्नाटक सरकारने घेऊन शिवसेनेची मागणी मान्य केली आहे. मनगुत्तीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल. त्याचबरोबर येत्या आठ दिवसात कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कर्नाटक सरकारने कबूल केले आहे.

कर्नाटक प्रशासन शिवसैनिकांसमोर नरमले, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुतळा बसवण्याची भूमिका

याबाबतची माहिती तहसीलदार अशोक घुराणे यांनी दिली. मात्र याबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात मोठ्या प्रमाणात दोन्ही राज्याकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

15 दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर दोन्ही राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणी पुन्हा पुतळा बसवण्यात येईल असा निर्णय, मनगुत्ती, बेनकोळी, बोषानहट्टी आणि प्रशासनाने घेतला होता. त्यावर आक्रमक झालेला शिवसेनेने येत्या पंधरा दिवसांत पुतळा न बसवल्यास कर्नाटकात घुसून मनगुत्तीमध्ये प्रतिकात्मक पुतळा बसवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज पद्धतीने शिवसैनिक मनगुत्तीकडे रवाना झाले. मात्र, सीमाभागात असणाऱ्या कवळीकट्टी गावातच कोल्हापूर पोलिसांनी शिवसैनिकांचा फौजफाटा रोखला. त्यावर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आमचा वाद कर्नाटक सरकारशी आहे. तुम्ही अडवण्याचा संबंध नाही,असे ठणकावून सांगितले. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा हाती घेत पायी चालत जात शिवसैनिकांनी कर्नाटकची वेस गाठली. मात्र वेशीवरच कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना रोखले. त्यावेळी आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारत घोषणाबाजी सुरू केली.

मनगुत्ती गावात पाच महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी सर्व परवानगी घेऊन हे पुतळे बसवण्यात येणार होते. मात्र १५ दिवस उलटून देखील बाबत निर्णय झालेल्या नाही. आम्हाला कर्नाटकची सीमा ओलांडून मनगुत्ती गावात जाण्याची परवानगी द्यावी. लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाला कळवू,अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी हुक्केरीचे तहसीलदार अशोक घुराणे यांच्याकडे केली. मात्र, ही मागणी धुडकावत आपले मागण्याचे निवेदन द्यावे, असे घुराणे यांनी सांगितले. त्यावर या संदर्भात कोल्हापूर व बेळगावचे जिल्हाधिकारी, दोन मंत्री, खासदार यांची बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढा,अशी मागणी शिवसेनेने केली. ही मागणी मान्य करून येत्या आठ दिवसांत बैठक घेत असल्याचे तहसीलदार यांनी मान्य केले. शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष विजय देवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, संग्रामसिंह कुपेकर,सुनील शिंत्रे यांनी मागण्याचे निवेदन हुक्केरीचे तहसीलदार अशोक घुराणे यांच्याकडे दिले. मात्र, याला विलंब झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details