महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुतळा हटाव प्रकरण; कोल्हापूरचे शिवसैनिक कर्नाटकातील मनगुत्तीकडे रवाना - Karnataka Belgaum Mangutti News

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. येथील प्रशासनाने दहा दिवसांत पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले होते. ते न पाळल्याने आपण कर्नाटकात घुसत आहोत आणि मनगुत्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा बसवणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सांगितले.

पुतळा हटाव प्रकरण
पुतळा हटाव प्रकरण

By

Published : Aug 25, 2020, 1:40 PM IST

कोल्हापूर - बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्तीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा हटवण्यात आलेला पुतळा दहा दिवसांत बसवावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी पुतळा बसवला नसल्याने आज आक्रमक झालेले शिवसैनिक कर्नाटककडे रवाना झाले आहेत.

पुतळा हटाव प्रकरण; कोल्हापूरचे शिवसैनिक कर्नाटकातील मनगुत्तीकडे रवाना
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आला होता. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, ग्रामस्थांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या दहा दिवसात बसवण्याचा निर्णय झाला होता. प्रशासनानेही येत्या दहा दिवसांत पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले होते. तर, तेव्हा आक्रमक झालेल्या शिवसेनेने येत्या दहा दिवसात पुतळा बसवला नाही तर कर्नाटकात घुसण्याचा इशारा दिला होता.

कर्नाटकच्या भाजप सरकारने त्यांचे आश्वासन न पाळल्याने आम्ही कर्नाटकात घुसत आहोत, असे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी सांगितले. तसेच, मनगुत्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा बसवणार असल्याचे ते म्हणाले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास आक्रमक झालेले शिवसैनिक कर्नाटककडे रवाना झाले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा देत शिवसैनिक कर्नाटककडे रवाना झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details