महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरवासीयांना लवकरच पाइपलाइनचे पाणी मिळणार - हसन मुश्रीफ - Kolhapur residents will soon get pipeline water

काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही अडचणींमुळे या योजनेला विलंब झाला. आता पुढच्या वर्षी मे महिन्याच्या अखेर कोल्हापूर वासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद

By

Published : Jun 18, 2021, 6:54 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील जनतेला शुद्ध, मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. परिणामी यावर्षी थेट पाइपलाइनद्वारे पाणी मिळू शकणार नसले तरी पुढच्या वर्षी मे महिन्याच्या अखेर कोल्हापूरवासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पुढच्या वर्षी काळम्मावाडी धरणातून आणलेल्या पाण्यानेच शहरवासीय अभ्यंगस्नान करतील अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे थेट पाइपलाइनच्या कामाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर येथे पत्रकार परषदेत बोलताना

'थेट पाइपलाइनचे काम 80 टक्के पूर्ण'

कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. सुमारे 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही. सध्या जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला स्पष्ट सूचनाही दिल्या असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. तसेच, यावर्षीच्या दीपावलीला कोल्हापूरवासीयांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करू शकलो नसल्याबद्दल मुश्रीफ यांनी शहरवासीयांची माफीही मागितली आहे. मात्र, (2022) सालची दीपावली शहरवासीयांच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यानुसार लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

'जलशुद्धीकरण केंद्राचे काम 95 टक्के पूर्ण'

थेट पाइपलाइन योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे केवळ तीन किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पूर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आत्तापर्यंत सुमारे 5 कोटी 30 लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची, माहिती महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details