कोल्हापूर - महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असतानाच कोल्हापुरात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कायम आहे. त्यातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तब्बल 6रुग्ण आढळले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. खरंतर हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आता अहवाल प्राप्त झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने कोणीही घाबरण्याची गरज नाही असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या भागात आहेत हे रुग्ण? -
प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर मायक्रोबायोलॉजी विभागाकडून जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी मे, जून आणि जुलै महिन्यात प्रति महिना 100 असे सॅम्पल पाठविण्यात आले होते. त्यामधील आजपर्यंत एकूण 7 जण डेल्टा प्लसने बाधित असल्याचे समोर आले आहे. यातील 1 रुग्ण मागील आठवड्यात तर 6 रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हे सर्व रुग्ण सध्या कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वजण सुरक्षित आहेत अशी माहितीही विभागाकडून देण्यात आली आहे. आढळलेल्या 7 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोल्हापूर शहरातील सानेगुरुजी वसाहत (2), विचारे माळ (1) आणि चव्हाण कॉलनी (1) या परिसरातील आहे तर उरलेल्या 3 रुग्णांमध्ये हातकणंगले तालुक्यातील 2 आणि करवीर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. यात 3 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश असून यामध्ये 18 वर्षाखालील एकाचा तर 60 वर्षांवरील दोघांचा समावेश आहे.
डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यानंतर करण्यात येणारी कार्यवाही -
- रुग्णांची सविस्तर माहिती घेणे, रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास, त्याच्या लसीकरणाचा इतिहास, त्याच्या आजाराचे स्वरूप याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती संकलित करण्यात येते.
- युद्धपातळीवर जवळच्या शेजाऱ्यांचा शोध घेऊन रुग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांपैकी कोणाला कोरोना सदृश्य लक्षण असल्यास त्यांचे प्रयोगशाळेकडे नमुने पाठविण्यात येतात.
- पुनःसंसर्ग झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या जातात.
- लसीकरणानंतर कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने घेण्यात येतात.
म्युटेशन म्हणजे काय? -