महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

1 नोव्हेंबरपासून सुरू होणार राधानगरी दाजीपूर जंगल सफारी, पर्यटकांना पर्वणी - कोल्हापूर राधानगरी

दरवर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंत पावसाळी ऋतूत अभयारण्य पर्यकांसाठी बंद केले जाते. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. सध्या हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण, जंगलात पसरलेली हिरवाई, विविध पक्ष्यांचे मंजुळ आवाज व जंगलातील मातीच्या रस्त्यावरून जंगल न्याहाळत जाताना दिसणारे वन्यप्राणी, उभयचर, फुलपाखरे, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांना अभयारण्याचे दरवाजे 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहेत.

दाजीपूर जंगल सफारी
दाजीपूर जंगल सफारी

By

Published : Oct 31, 2021, 12:34 PM IST

कोल्हापूर - राधानगरी दाजीपूर जंगल सफारी आता उद्या सोमवारी (1 नोव्हेंबरपासून) सुरू होणार आहे. पश्चिम घाटातील जैव विविधतेने समृद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात जुने अशी राधानगरी दाजीपूर अभयारण्याची ओळख आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंत पावसाळी ऋतूत अभयारण्य पर्यकांसाठी बंद केले जाते. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंद होते. मात्र आता पुन्हा एकदा जंगल सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. सध्या हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण, जंगलात पसरलेली हिरवाई, विविध पक्ष्यांचे मंजुळ आवाज व जंगलातील मातीच्या रस्त्यावरून जंगल न्याहाळत जाताना दिसणारे वन्यप्राणी, उभयचर, फुलपाखरे, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांना अभयारण्याचे दरवाजे 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहेत.

'या' वेळेत करता येणार जंगल सफारी; अशी आहे सुविधा

दररोज सकाळी 6 वाजता जंगल सफारीला सुरवात होणार असून दुपारी 2.30पर्यंत सफारी साठी प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक मंगळवारी अभयरण्यास साप्ताहिक सुट्टी असेल. जंगल सफारीमध्ये ठाक्याचा वाडा, मुरडा बांबर, लक्ष्मी तलाव, वाघांचे पाणी, सांबर कुंड, हाडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा असे नैसर्गिक पाणवठे, निरीक्षण मनोरे पाहता येतात. अभयारण्यात दुचाकी व खासगी वाहनांना बंदी असून वन्यजीव विभागामार्फत कार्यरत स्थानिक परिस्थिती की वन्यजीव विकास समितीमार्फत स्थानिकांच्या ओपन व बंदिस्त जीपमधून जंगल सफारी करता येते. स्थानिक युवक गाइड म्हणून पर्यटकाना जंगलाची ओळख करून देतात.

वन्यजीव विभाग व स्थानिकांतर्फे मदत

राधानगरी व दाजीपूर येथून जंगल सफारीसाठी जीप मिळतात. प्रवेश फी व गाडी भाडे भरून जंगल सफारीचा आनंद लुटता येईल. राधानगरी येथील फुलपाखरू उद्यान व दाजीपूर येथील जंगल माहिती केंद्रसुद्धा पाहता येते. वन्यजीव विभाग व स्थानिकांच्या वतीने दाजीपूर व राधानगरी येथे निवास व भोजनाची सोय केलेली आहे. निसर्गातील जैववैविध्य अनुभवण्यासाठी सर्व पर्यटकांचे राधानगरी अभयारण्यातील जंगल सफारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details