कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकोर्डवरील २ गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे ४ गावठी पिस्तूल,मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत कोल्हापूर पोलिसांनी बेकायदा बंदूक वापरणारे आणि विक्री करणाऱ्यांवर तिसरी मोठी कारवाई केली आहे.
कोल्हापुरात ४ गावठी पिस्तूल जप्त, पंधरा दिवसांत तिसरी मोठी कारवाई - arm seized
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकोर्डवरील २ गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस दलाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शोध पथकाला एक व्यक्ती चंदगड परिसरामध्ये शस्त्रविक्री करायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चंदगड परिसरात सापळा रचला होता.
चंदगड तालुक्यात राहणारा विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापूर लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारा सुनील भिकाजी घाटगे या दोघांचा संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये ४ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, १ मॅक्झिन आणि ८ जिवंत काडतूसे असा २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील दोन्हीही गुन्हेगार पोलिसंच्या रेकॉर्डवरील असून पोलिसांची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.