कोल्हापूर- जंगलातील रानमेवा विकून पोटे भरणाऱ्या लोकांचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन यामुळे रानमेवा विकला जात नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी कोल्हापूर पोलिसांची 'मिशन संवेदना' टीम वाड्यावस्तीवर पोहोचून डोंगर कपऱ्यातील धनगरवाडे शोधून त्यांना मदत करण्याचे काम करत आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून जनतेच्या मदतीसाठी 'मिशन संवेदना' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडून धान्य स्वरूपात मदत घेवून गरजू व्यक्तींना वाटप करण्यात येते. या संकल्पनेतून गगनबावडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील बावेलीपैकी धनगरवाडा, जर्गीपैकी धनगरवाडा आणि शेळोशीपैकी धनगरवाडा येथील लोक रानमेवा विकून पोट भरतात. परंतु सद्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज (रविवारी) दानशुर व्यक्ती आणि सामाजिक संस्थेकडून मिळालेल मदत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी ३५ कुटुंबांना तांदुळ, गहु व डाळ अशा स्वरुपात वाटप केली. तसेच सदर उपक्रमांतर्गत गगनबावडा तालुक्यामधील परराज्यातील १५ कुटुंबांनाही धान्य वाटप केले. तिसंगी, किरवे, निवडे व वेस येथील ३५ गरजू व गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. असे एकूण १०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे.
रानमेवा विकून उदरनिर्वाह पण...