कोल्हापूर -दिवे, मेणबत्ती लावा मात्र, हाताला सॅनिटायझर लावले नसेल याची काळजी घ्या. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने ते पटकन पेट घेते. त्यामुळे दिवे, पणत्या, मेणबत्त्या लावताना याची दक्षता प्रत्येकाने घ्या, अशी महत्वपूर्ण सूचना कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांना दिली आहे.
कोल्हापूर पोलिसांनी दिवे लावताना केली 'ही' काळजी घेण्याची सूचना - PM Modi's appeal
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हे आवाहन करत असताना सुरक्षेचे आवाहन करायला पंतप्रधान मोदी विसरले.

कोल्हापूर पोलीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, हे आवाहन करत असताना सुरक्षेचे आवाहन करायला पंतप्रधान मोदी विसरले. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी प्रत्येकाने दिवे लावताना आपल्या हाताला सॅनिटायझर लावलेले नसेल याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ट्विटरवर ट्विट करत कोल्हापूर पोलिसांनी ही सूचना दिली आहे.