कोल्हापूर :बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवक अल्ताफ काझीसह कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडली ( Found in Sankeshwar Karnataka ) आहे. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज पहाटे कोल्हापूर पोलिसांनी त्यांना कोल्हापूरात आणले आहे. याबाबत संबंधित युवकावर गुन्हा दाखल ( case registered against concerned youth ) करण्यात आला आहे. भाजपा आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांनी काल सकाळीच कोल्हापूरमध्ये या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच रात्री पोलिसांनी संबंधित मुलाचा शोध लावला आहे.
आज अधिकृत पत्रकार परिषदेत पोलीस माहिती देणार : आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अल्ताफ काझी या 22 वर्षीय संशयीताचा फोटो कोल्हापूर पोलिसांनी प्रसिद्ध करत, अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केले होते. त्यानंतर त्याचा शोध लागला आहे. याबाबतच आज अधिकृतपणे पत्रकार परिषदेत पोलिसांकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन :याच संबंधित मुलीच्या शोध घेण्यात यावा आणि संबंधिताला ताब्यात घ्यावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचे शेकडो कार्यकर्ते जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलनाला बसले होते. या आंदोलनात मोठ्या महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या तर अनेकांच्या हातात उत्तर प्रदेश प्रमाणे योगी पॅटर्न पाहिजे असे फलक सुद्धा झळकत होते.
फुस लावून नेले पळवून :एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना अठरा दिवसापूर्वी घडली असल्याचे समोर आले. शिवाय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. यामुळे याबाबत मुलीच्या कुटुंबियांनी जुना राजवाडा पोलिसांना याबाबत जाब विचारला आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या आक्रमकतेनंतर पोलिसांनी दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काल अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच भाजपने पाठिंबा देत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर लगेचच रात्री मुलीचा शोध लागला आहे.