महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

We Support Shivraj Naikwade : देवस्थान समितीवरुन सचिवाला हटविण्याचे कारस्थान; कोल्हापुरकरांचा अधिकाऱ्याला पाठिंबा - शिवराज नाईकवाडे कोल्हापूरांचा पाठिंबा

कोल्हापूर जिल्ह्यात सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असल्याने येथे कायम पर्यटकांची रेलचेल असते. ( Kolhapur Tourism ) कोल्हापुरातील राजकारण आणि यातील डावपेच देखील सर्वांना माहीतच आहे. ( Kolhapur Politics )

Kolhapurkars support the officer
कोल्हापुरकरांचा अधिकाऱ्याला पाठिंबा

By

Published : Feb 13, 2022, 1:28 PM IST

Updated : Feb 13, 2022, 3:40 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्याला सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असल्याने येथे कायम पर्यटकांची रेलचेल असते. ( Kolhapur Tourism ) कोल्हापुरातील राजकारण आणि यातील डावपेच देखील सर्वांना माहीतच आहे. ( Kolhapur Politics ) कोल्हापूरकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एखादा सरकारी अधिकारी प्रामाणिक असेल तर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि एखादा अधिकारी कामचुकार किंवा भ्रष्टाचार करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायलाही कोल्हापूरकर कधीच मागे नसतात.

प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात अशाच एका अधिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रामाणिक आणि लोकांसाठी चांगली कामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर राजकीय डावपेचामुळे पदावरून काढण्याचे कटकारस्थान चालू आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव असलेल्या शिवराज नाईकवाडे यांच्या पाठिशी अख्ख कोल्हापूर उभा राहत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी आता सोशल मीडियावरुन वी स्टॅन्ड विथ शिवराज नाईकवाडे हे हॅशटॅग ( We Support Shivraj Naikwade ) चालवत मोहीम चालू करण्यात आली आहे.

सर्व स्तरातून नाईकवडे यांच्या कामाची स्तुती -

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासह इतर सुमारे तीन हजार मंदिरांवर नियंत्रण- व्यवस्थापन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती स्थापन केली आहे. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ काम करत असते. तर सचिवपदी शासकीय व्यक्ती असते. हे सर्व मंडळ महाराष्ट्र शासनाच्या न्याय आणि विधी विभागामार्फत नेमले जाते. मात्र, संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर देवस्थान समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार तर सचिव म्हणून शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापुरकरांचा अधिकाऱ्याला पाठिंबा

हेही वाचा -Kirnotsav Kolhapur : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव तिसऱ्या दिवशी पूर्ण; पाहा, दृश्ये..

गेल्या सहा महिन्यापासून नाईकवाडे हे देवस्थान समितीचे अत्यंत उत्कृष्ट काम करत असल्याचं जगजाहीर आहे. त्यातच अनेकांनी केलेल्या तक्रारी वरून तत्कालीन संचालक मंडळाने देवस्थान समितीत केलेल्या घोटाळ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. या घोटाळ्याची चौकशी पूर्ण करून याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, याचा राग मनात धरून काहींनी नाईकवाडे यांना सचिव पदावरून हटवण्यासाठी कागदपत्रांचा हवाला देत न्याय विधी खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे. आता त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकर आता रस्त्यावरची लढाई लढण्यास उतरले आहेत. वी सपोर्ट शिवराज नाईकवडे ही मोहिम कोल्हापूरकरांनी सुरू केली आहे.

कोल्हापुरकरांचा अधिकाऱ्याला पाठिंबा

चुकीचे काम केलेल्यांचे अहवाल पाठवले -

शिवराज नाईकवडे हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव आहेत. जुनी देवस्थान समिती बरखास्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांची सचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. सचिव पदावर नियुक्ती झाल्यापासून नाईकवाडे यांनी नवरात्री तसेच कोरोनाकाळात अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करत प्रत्येक भाविकांना शिस्त लावत दर्शन घडवले. तसेच वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अतिरिक्त खर्चाला फाटा देत नवनवीन योजना राबवत खर्च कमी केला. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक कोल्हापूरकर तसेच दर्शनासाठी आलेल्या भविकांमधून होऊ लागले. दरम्यान, शहरातील अनेक संघटनांनी अगोदर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तर देवस्थान समितीमधील चुकीच्या कामाची चौकशी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी नाईकवाडे यांच्याकडे दिली. त्यामुळे शिवराज नाईकवडे हे देवस्थान समितीत अगोदर झालेल्या चुकीची कामे बाहेर काढायला सुरुवात केली. यामुळे अनेकांना घाम सुटला. चौकशीचे आदेशही निघाले. यामुळे या सर्वातून स्वतःला वाचवण्यासाठी काही दिवसांपासून शिवराज नाईकवाडे यांना हटवण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. कोल्हापूरकरांनी शिवराज नाईकवाडे यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना शेकडो मेल पाठवले आहेत.

दरम्यान वी सपोर्ट शिवराज नाईकवाडे या मोहिमेची पालकमंत्री सतेज पाटील यांनीही गंभीर दखल घेतली आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. नाईकवाडे यांनी देवस्थान समितीतील गैरप्रकार बाहेर काढल्यामुळे, असे होतेय की काय? अशीही शंकाही त्यांनी उपस्थित केली.

Last Updated : Feb 13, 2022, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details