महाराष्ट्र

maharashtra

'मास्क नाही तर प्रवेश नाही' ही कोल्हापूरची मोहीम आता मुंबईत सुद्धा

कोल्हापुरातील मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करून राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत.

By

Published : Sep 30, 2020, 10:49 PM IST

Published : Sep 30, 2020, 10:49 PM IST

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर -'मास्क नाही, तर प्रवेश नाही' कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम 'बेस्ट'ने मुंबईत राबविण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 'मास्क नाही, तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही' अशी अभिनव मोहीम सुरू केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी जनजागृती करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा -कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा सायकलवरून फेरफटका; मास्क न घालणाऱ्यांना खडेबोल

ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदाराने मास्क घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्यात येत आहेत. या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करून राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबईत 'बेस्ट' च्या सर्व बस स्थानकावर याचे फलक लावण्यात आले आहेत.

हेही वाचा -स्वाभिमानीची ऊस परिषद नोव्हेंबरमध्ये? राजू शेट्टींनी सरकारला दिला 'हा' इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details