कोल्हापूर - शहरात पूरग्रस्तांनी अलमट्टी धरणाची प्रतिकात्मक दहीहंडी फोडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला आहे. यावेळी अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.
कोल्हापूरात पूरग्रस्तांकडून अलमट्टी धरणाची प्रतिकात्मक दहीहंडी - Almatti dam symbolic dahihandi in kolhapur
अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव...अशा घोषणा देत, कोल्हापूरात पूरग्रस्तांनी अलमट्टी धरणाची प्रतिकात्मक दहीहंडी फोडून दहीहंडीचा उत्सव साजरा केला आहे.
कोल्हापूरात उद्भवलेल्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे मानत, याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सिटीझन फोरम आणि पूरग्रस्तांनी अलमट्टी धरणाची प्रतिकृती फोडून दहीहंडी साजरी केली. यावेळी अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव च्या घोषणा देण्यात आल्या. शहरातील शिवाजी चौक इथे दहीहंडी फोडून हे आंदोलन करण्यात आले. "महिनाभरात अलमट्टी धरणाच्या उंची कमी करण्याबद्दल निर्णय नाही झाला, तर तीव्र आंदोलन करू आणि त्याला शासन जबाबदार असेल" असा इशारा सिटीझन फोरमचे ऍड. प्रसाद जाधव यांनी यावेळी दिला.