कोल्हापूर - मुंबई विमानसेवा उद्यापासून पूर्ववत होणार आहे. गेल्या 7 डिसेंबर पासून तांत्रिक कारणास्तव ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी, सकाळचा स्लॉट मिळवण्यात मात्र प्रशासनाला अपयश आले आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून पूर्ववत; 7 डिसेंबरपासून तांत्रिक कारणांमुळे होती बंद - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद
गेल्या 7 डिसेंबर पासून तांत्रिक कारणास्तव ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता विमानसेवा पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी, सकाळचा स्लॉट मिळवण्यात मात्र प्रशासनाला अपयश आले आहे.
हेही वाचा -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांचा सिडकोसमोर मुक्काम मोर्चा
रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आहे. त्यामुळे उडान योजनेअंतर्गत कोल्हापूरहून विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उडान फेज-2 अंतर्गत, 1 नोव्हेंबरपासून कोल्हापूरहून हैदराबाद आणि बेंगलोरसाठी विमाने उड्डान घेत आहेत. तर, उडान फेज-3 अंतर्गत कोल्हापूर-मुंबई आणि कोल्हापूर-तिरूपती हे मार्ग मंजुर झाले आहेत. ते सुरू करण्यात आले असून, या सेवेला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, तांत्रिक कारणास्तव कोल्हापूर-मुंबई सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.