कोल्हापूर - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो कोल्हापूरच्या गिर्यारोहकाने सर केले. या गिर्यारोहकाने या शिखरावर ७१ फूट तिरंगा सुध्दा फडकावला. या मोहिमेमध्ये सागर नलवडे यांच्यासह त्याचे सहकारी अर्णाळा वसई येथील रोहित पाटील, इंदापूर येथील योगेश करे आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस जवान आशिष दीक्षित सहभागी झाले आहेत.
कोल्हापूरच्या गिर्यारोहकानं, 'किलिमंजारो' शिखरावर फडकवला ७१ फुटी तिरंगा - News about 71 foot flags
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो कोल्हापूरच्या गिर्यारोहकाने सर केले. या शिखरावर त्यांनी ७१ फूट तिरंगा फडकावला.
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर कोल्हापूरच्या गिर्यारोहकाने फडकवला ७१ फुटांचा तिरंगा
माऊंट किलीमांजरो समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर उंच आहे. या शिखरावर सद्या उणे १५ ते २० अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. ही सर्व आव्हाने स्वीकारत सागर नलवडे यांनी त्याच्या मित्रांसह या शिखरावर तिरंगा फडकवत हा नवा विक्रम प्रस्थापित केला.
Last Updated : Jan 27, 2020, 8:28 PM IST