कोल्हापूर - सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी आज कोल्हापूरातील एक हजारहून अधिक व्यापारी रस्त्यावर उतरले. आपापल्या दुकानांच्या बाहेर फलक घेऊन हे सर्व व्यापारी आंदोलनात उतरले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्व संलग्न संघटनातर्फे या अनोख्या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याला सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कडक नियमावली घालून द्या त्याचे काटेकोरपणे पालन करू पण आता दुकान सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आपले व्यवहार बंद ठेवत पाठिंबा दिला.
कोल्हापुरातील सर्वच व्यापारी रस्त्यावर;
हेही वाचा-ह्युंदाई अलकाजार एसयूव्हीची बुकिंग आजपासून सुरू
ऐन सणासुदीच्या काळात दुकानांमध्ये भरलेला माल अजूनही तसाच पडून
आंदोलनाच्या माध्यमातून व्यापारी म्हणाले, जवळपास 60 दिवस दुकाने बंद असल्याने माल खराब होण्याचीदेखील शक्यता आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, ईद, लग्नसराईचा हंगाम असल्याने सर्व माल दुकानात भरून ठेवला होता. त्याचे पैसेदेखील व्यापाऱ्यांना द्यावे लागणार आहेत. ऐन हंगामामध्ये वर्षातील 40 ते 45 टक्के व्यवसाय होत असल्याने तो माल अजूनही दुकानांमध्ये पडून असल्याने फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कोल्हापूरच्या सर्व व्यापाऱ्यांनी सरकारच्या सर्व नियमांचे आजपर्यंत कठोर पालन केलेले आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की, कोल्हापूर शहरातील पॉझिटीव्ही रेट जिल्ह्यापेक्षा बराच कमी आहे. लॉकडाऊनला दोन महिने उलटून गेले असल्यामुळे कोणत्याही व्यापाऱ्यांच्या खिशात अथवा बँकेत पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा करण्यात आली.
व्यापाऱ्यांचे दुकानाबाहेर आंदोलन हेही वाचा-'या' शहरात पेट्रोलनंतर डिझेल दराचे गाठणार शतक
आंदोलनानंतर चेंबर ऑफ कॉमर्सचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन-
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांच्या भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आंदोलनानंतर निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार कोल्हापुरात फक्त जीवनावश्यक सेवा देणारे व्यवसाय सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू करण्याची मुभा दिलेली आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने कोल्हापुरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्याला आज 60 दिवस उलटले आहेत. सर्व व्यापाऱ्यांना दुकान भाडे, लाईट बिल, पाणी बिल, कर्जाचे हप्ते, घरफाळा, परवाना फी, टेलिफोन बिल, विम्याचे हप्ते, कामगारांचे पगार, शासनाचे सर्व कर हे दुकान बंद असतानाही भरावे लागत आहेत. ते वेळेवर न भरल्यास त्यावर दंड व व्याज लागून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारने व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई अनुदानाच्या स्वरुपात ताबडतोब जाहीर करावे. तसेच व्यवसाय कर, लाईट बील, पाणीपट्टी व स्थानिक प्रशासनास सांगून घरपट्टी माफ करून व्यापाऱ्यांना मदत करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.
अटी लागू करा, पण व्यवसायाला परवानगी द्या-
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप कापडिया म्हणाले, की व्यवसाय बंद असल्याने घर चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे अटी घालून व्यवसायाला परवानगी द्या.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, कोणतेही नियम लागू करा, पण व्यवसायाला परवानगी द्या. कारण, व्यापाऱ्याला विविध कर भरावे लागत आहेत.