कोल्हापूर Kolhapur Immersion Issue : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित न करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा (Immersion of Ganesha idol in Panchganga river) प्रशासनाने घेतला होता. याला कोल्हापूरकरांनी (Kolhapur Panchganga river) दोन वर्ष चांगला प्रतिसाद दिला. मात्र, यंदा कोल्हापुरातील काही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन (police clash against Hindutva) आणि कार्यकर्ते आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गायकवाड वाडा येथे आमने-सामने आले. जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेकडून पंचगंगा नदी घाट परिसरात बॅरिकेट लावून घाटावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी एकत्र येत चार वाजेपर्यंत बॅरिकेट हटवा, अन्यथा बॅरिकेट तोडून नदीतील वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करणार असल्याचा निर्धार केला होता. सायंकाळी चार वाजता शहरातील सर्व संबंधित संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने लावलेले बॅरिकेट ढकलून लावत नदी घाटावर प्रवेश केला, नागरिकांनाही वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित करण्याचं आवाहन केलं. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांपुढे पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स हटवून नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित केल्या.
पर्यावरणपूरक विसर्जनाला छेद : कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. याला नदीकाठावरील साखर कारखाने मैलामिश्रित आणि केमिकल युक्त सांडपाणी जबाबदार असल्याचा आरोप होतो. नदीतील जलचर मृत्युमुखी पडले होते. गणेश विसर्जनात गणेश मूर्ती थेट नदीत विसर्जित केल्यामुळेही प्रदूषणाला हातभार लागेल. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिका आणि प्रशासनाला गणेश मूर्ती विसर्जन नदीत न करण्याचे निर्देश दिले होते. गेली दोन वर्षे कृत्रिम कुंडातच विसर्जन करून कोल्हापूरकरांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे निर्बंध झुकारून लावले.