महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Diwali Padwa : कोल्हापूरकरांनी जपलीय पाडव्यानिमित्त म्हशींना नटवून पळवण्याची अनोखी परंपरा - म्हैस पळवुन आनोखी परंपरा

ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. अशीच परंपरा पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील कसबा बावडामध्ये पाहायला मिळाली. गेल्या अनेक वर्षापासून कसबा बावड्यातील शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशींना नटवून त्यांची सौंदर्य स्पर्धा घेतात. तसंच म्हशी पळवण्याची आनोखी परंपरा जोपासतायत.

Kolhapur Diwali Padwa
Kolhapur Diwali Padwa

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 2:40 PM IST

Updated : Nov 14, 2023, 10:51 PM IST

म्हशींना नटवून पळवण्याची अनोखी परंपरा

कोल्हापूर :दिवाळी पाडव्यानिमित्त म्हशी सजविण्याचा पारंपरिक बाज कोल्हापुरात आजही जपला जातो. सकाळी पंचगंगा नदीवर म्हशींना आंघोळ घातली जाते. त्यानंतर नटवलेल्या म्हशींना घेऊन म्हैसमालक कसबा बावडा येथील मार्केट परिसरात घेऊन येतात. म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात आणि पायात घुंगराची माळ, शिंगांवर मोरपीसे, रिबीन याद्वारे म्हशींना सजविण्यात आले.

शहरवासीयांची मोठी गर्दी : मोटरसायकलचा सायलेंसर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हशी पळवत, झेंडा दाखवत नटलेल्या म्हशींना मोटरसायकलच्या मागून पळवले जाते. यासाठी ना कोणते बक्षीस, ना कोणाशी स्पर्धा, मात्र कोल्हापूरचा ग्रामीण बाज जपण्यासाठी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कसबा बावड्यात भारतवीर तरुण मंडळाने या अनोख्या परंपरेला आता ग्लोबल टच दिला आहे. म्हशींना सजवण्यासाठी आधुनिक सौंदर्य साधने वापरली जात आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडासह शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, पाचगाव या ठिकाणी पाडवा तसंच भाऊबीजेच्या दिवशी म्हशी पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे पाहण्यासाठी शहरवासीयांची मोठी गर्दी झालेली होती.



स्पर्धा नव्हे परंपरा :दीपावली पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी विविध स्पर्धा भरवल्या जातात. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भारतवीर तरुण मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून म्हशी पळवण्याचा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. नव्या पिढीला या परंपरा समजाव्यात या उद्देशानं भारतवीर तरुण मंडळाकडून ही परंपरा जपली जात आहे.


मालकासह सजलेल्या म्हशी रस्त्यावर :नुकताच बळीराजाचा खरीप हंगाम संपला असून यानंतर शेतकरी आणि त्याच्या पशुधनाला काहीशी मोकळी असते. या वेळेत मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या आपल्या गायी-म्हशींना ऐन दिवाळीत कृतज्ञता म्हणून साज शृंगाराने सजवले जाते. यानंतर मालकासह सजलेल्या म्हशी रस्त्यावर अवतरतात आणि मालकाच्या मोटरसायकल मागे पळवण्याची ही परंपरा झाल्यानंतर ग्रामदैवत वेताळबा आणि हनुमान मंदिरात या म्हशींना मालक घेऊन जातात. ग्रामदैवताच्या दर्शनानंतर ही अनोखी परंपरा संपते. सजलेल्या म्हशी पाहण्यासाठी जिल्ह्यातून शौकीन मोठ्या प्रमाणात येतात.

हेही वाचा :

  1. Sambhaji Raje Chhatrapati News : मला मुख्यमंत्री करा मग तुमचे प्रश्न सुटणार, असं का म्हणाले माजी खासदार संभाजीराजे? पाहा व्हिडिओ
  2. Agitation For Sugarcane Rate : कोल्हापुरात ऊस दर आंदोलन पेटलं, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना लावल्या आगी
  3. Youth Brutally Beaten: तरुणासोबत बसलेली अल्पवयीन मुलगी रडत असल्यानं जमावाचा झाला गैरसमज; तरुणाला बेदम मारहाण
Last Updated : Nov 14, 2023, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details