महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचा रुग्ण नाही - जिल्हाधिकारी देसाई

आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. पण, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई
जिल्हाधिकारी दौलत देसाई

By

Published : Mar 10, 2020, 10:39 PM IST

Updated : Mar 10, 2020, 11:33 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात एकूण 16 जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी 9 लोकांचा 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला असून उर्वरीत 7 जणांवर निरीक्षण चालू आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. पण, प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात एकूण 48 आयसोलेटेड खाटांची व्यवस्था सुद्धा तयार असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेला महानगरपालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, स्थानिक स्वराज्यसंस्था आणि सर्व सबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन, अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय कोरोना विषाणू प्रतिबंध होण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. सी.पी.आर. रूग्णालयामध्ये एकूण 20 खाट, आयसोलेशन रूग्णालयामध्ये 10 खाट, इचलकरंजी आय.जी.एम. येथे 4 खाट, गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयात 4 खाट आणि खासगी रुग्णालय अॅस्टर आधार येथे 10 खाट, असे एकूण 48 आयसोलेशन खाट रुग्णांसाठी तयार ठेवण्यात आले आहेत.

त्याच बरोबर करोनाग्रस्त देशामधील परदेशवारी करुन आलेल्या एकदम जास्त लोकाची संख्या असल्यास त्यांच्यासाठी वेगळा कक्ष (कोरोनटाईन) तयार करण्यात आला आहे. या अलगीकरण (कोरोनटाईन) कक्षामध्ये ज्या लोकांना कोरोनाचे आजाराचे लक्षणे नाहीत अशा लोकांना 14 दिवस एकत्र ठेवून निरीक्षण करण्यासाठी अलगीकरण (कोरोनटाईन) पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 40 रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच गरज पडल्यास प्रशिक्षण केंद्राच्या मेसमध्ये 20 रुग्णांचे व्यवस्था करण्यात येऊ शकते, अशी माहिती सुद्धा यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.

आत्तापर्यंत कोल्हापूरचे 16 लोक आले कोरोनाग्रस्त देशातून

आतापर्यंत 2 फेब्रुवारी 2020 पासून एकूण 16 लोक कोरोनाग्रस्त देशातून प्रवास करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आहेत. चीनमधून 5, इटलीतून 4, इराणमधून 1 आणि सौदी अरेबिया येथून 6 आले आहेत. त्यांच्यापैकी 9 लोकांचा 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला असून त्यांना कोणत्याही प्रकारे कोरोना सदृश आजाराची लक्षणे नाहीत. उर्वरित 7 लोकांचे निरीक्षण चालू असून त्यांचा 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. त्यांनाही कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : अंबाबाई मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांच्या हाताला 'सॅनिटायझर'

Last Updated : Mar 10, 2020, 11:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details