महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा...त्याच माझ्यासाठी शुभेच्छा; पालकमंत्र्यांचे आवाहन - पालकमंत्री सतेज पाटील मास्क वापरण्याचे आवाहन

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर करा याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असे त्यांनी म्हटले आहे. उद्या 12 एप्रिल रोजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापुरातील जनतेला आवाहन केले आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Apr 11, 2021, 3:38 PM IST

कोल्हापूर- राज्यासह जिल्ह्यातही पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर करा याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असे त्यांनी म्हटले आहे. उद्या 12 एप्रिल रोजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापुरातील जनतेला आवाहन केले आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

12 वर्षांपासून पाटील वाढदिवसाला हार बुके स्वीकारत नाहीत -

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील गेल्या 12 वर्षांपासून आपल्या वाढदिवसादिवशी हार-बुके स्वीकारत नाहीत. वाढदिवसादिवशी मोठ्या संख्येने जिल्ह्यासह अनेक भागातील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हार-बुके जमा होत होते. मात्र, त्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा प्रत्येकाने वह्या भेट दिल्यास त्याचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो, ही कल्पना सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. त्यानंतर 12 वर्षांपासून सातत्याने ते आपल्या वाढदिवसादिवशी हार-बुके स्वीकारत नसून केवळ वही भेट देत चला, असे त्यांनी म्हटले. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यक्रम, समारंभांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही या वर्षी वाढदिवस साजरा न करता सर्वांनी आपापल्या घरी राहा, आणि प्रत्येकाने 'मास्कचा वापर करा' याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details