कोल्हापूर- गेल्या दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होत असलेल्या गणेश उत्सवाची आज सांगता होत आहे. गणपती बाप्पांचे आज( बुधवार) अनंत चतुर्थीला विसर्जन केले जात आहे. कोल्हापूर शहरातून वाजत-गाजत आणि पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पांची मिरवणूक पार पडत असून पंचगंगा नदी पात्रामध्ये गणेश विसर्जन होत आहे.
निरोप लाडक्या बाप्पाला ; कोल्हापुरात पंचगंगेकिनारी गणेश मंडळे दाखल - ganesh festival kohapur
कोल्हापूर शहरातून वाजत-गाजत आणि पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पांची मिरवणूक पार पडत असून पंचगंगा नदी पात्रामध्ये गणेश विसर्जन होत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळे दाखल झाली असून विसर्जनाचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच पंचगंगा नदी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पण, पाण्याची पातळी देखील कमी झाल्याने याठिकाणी आता गणेश विसर्जन सुरू आहे.
मागील महिन्यात कोल्हापूरवर महापूराची आपत्ती ओढावली होती. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना पुन्हा कधीही अशी आपत्ती येऊ नये म्हणून अनेक मंडळे प्रार्थना करणार आहेत. याबाबत अधिक माहिती ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी शेखर पाटील यांनी दिली आहे.