कोल्हापूर -चिखली येथील रामदास पाटील या तरुणाने महापुरातून आपल्या 10 गायींना यशस्वीपणे वाचवले आहे. 48 तासाहून अधिक वेळ पाण्यात राहून रामदास आणि त्याच्या भावाने आपल्या पशूधनाला सुरक्षित ठेवले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून इतरांनीही आपल्या जनावरांना वाचवले आहे.
त्याने शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही...महाप्रलयातून पशूधन वाचविणारा जिद्दी तरुण त्याची जिद्द पाहुन इतरांनाही हुरूप आले...
कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. सर्वात मोठे नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे कारण या महाप्रलयात मोठ्या प्रमाणात पशूधन वाहुन गेले. मात्र, कोल्हापूरच्या चिखली येथील रामदास पाटील या तरुणाने मोठ्या जिद्दीने आणि धाडसाने आपल्या पशुधनाला म्हणजे दहा गायींना वाचवले आहे. 2 दिवस पाण्यात राहून जनावरांच्या माना पाण्याच्यावर पकडून यांनी आपल्या जनावरांना वाचविले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महाप्रलयामध्ये अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. अनेकांना आता पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. हा महाप्रलय असा होता की, जिल्ह्यातील शेकडो जनावरे पाण्यातून वाहून गेलीय आहेत. त्यामुळे अनेकांचे गोठे आता मोकळे असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चिखली येथे मात्र थोडसं वेगळे चित्र पहायला मिळत आहे. येथील नागरिकांनी या महाप्रलयातून आपल्या जनावरांना सहीसलामत वाचवले आहे.