कोल्हापूर : एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रणजित यांची टेक्निशियन म्हणून इस्रोमध्ये निवड झाल्याने संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. 2022 मध्ये टेक्निशीयन बी या पदासाठी झालेल्या इस्रोच्या परीक्षेत रणजित खोत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. देशभरातून पाचव्या रँकने त्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे.
कोल्हापूरातील आयटीआयमध्ये शिक्षण रणजित खोत यांनी काही दिवस नोकरी केली. त्यानंतर पुन्हा येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयात डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथील एका आयटीआयमध्ये नोकरी केली. 2017 पासून ते या ठिकाणी शिक्षक म्हणून नोकरी करत होते. हे करत असतानाच त्यांनी इस्रोची परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. इस्रोमध्ये जाऊन अंतराळ संशोधनात आपले थोडे योगदान असले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यानुसार त्यांनी परीक्षेच्या तयारीत कोणतीही कमतरता ठेवली. अखेर त्यांची टेक्निशियन बी या पदावर निवड झाली आहे.
देशात मिळविला पाचवा क्रमांक
आई व वडील दोघेही करतात शेतकरी-रणजित यांची बंगळुरूमधील यु आर राव सॅटेलाईट सेंटरमध्ये पोस्टिंग झाली आहे. त्यांनी यशानंतर सांगितले की, टेक्निशीयन बी या पदासाठी तब्बल 10 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यामध्ये देशभरातून पाचव्या रँकने उत्तीर्ण झालो आहे. रणजित यांचे आई व वडील दोघेही शेतकरी आहेत. तर एक भाऊ कोल्हापूरात एका कंपनीमध्ये नोकरी करतो. रणजित यांच्या यशानंतर अनेकांना करियरमध्ये प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
इस्रोची कामगिरी
- इस्त्रोकडून अंतराळ क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्याचे काम सातत्याने करण्यात येते. नुकतेच इस्रोने एकाच वेळी 36 उपग्रह प्रक्षेपित करून जगभरातील देशांना आश्चर्यचकित केले होते. इस्रोने प्रक्षेपित केलेले एलव्हीएम 3, 43.5 मीटर उंच आणि 643 टन वजनी आहे. ते वनवेबच्या 36 जेन 1 उपग्रहांचा अंतिम टप्पा वाहून नेण्यासाठी दुसऱ्या लॉन्च पॅड रॉकेट पोर्टवरून प्रक्षेपित करण्यात आले. या क्षेत्रातील इस्रोचे वर्चस्व पाहून ब्रिटनच्या नेटवर्क एक्सेस असोसिएट्स लिमिटेडने लो अर्थ ऑर्बिटमध्ये 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोसोबत करार केला.
- वनवेब ग्रुप कंपनीचे 36 उपग्रह 23 ऑक्टोबर 2022 रोजी इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आले होते. चीनकडून अनेकदा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पाडण्यात आले आहेत. यावरून अंतराळात युद्ध सुरू होणार असल्याचे संरक्षणतज्ज्ञ सांगतात. अशी कामगिरी करण्यातही भारत मागे नाही. इस्रोने निकामी झालेला उपग्रह प्रशांत महासागरात पाडला होता.
ISRO launched LVM 3 : इस्रोने भारताचे सर्वात मोठे एलव्हीएम - 3 रॉकेट केले प्रक्षेपित, एकाच वेळी पाठवले 36 उपग्रह!