आमच्या बायकांना लुगडी मिळणात, पोरांची लग्न हुईनात आणि नेत्यांच्या बायका...! कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा संताप
सगळी सरकारे लुटारूंची टोळी आहेत. दीड पट हमीभाव देण्याची आजपर्यंत सर्वांनी टोलवाटोलवीच केली आहे. आतापर्यंत सर्वच आमदार, खासदारांनी गप्पा मारल्या, आमच्या बायकांना लुगडं मिळेना, पोरांची लग्न हुईनात, पण यांच्या बायका घरात बसून दूध पित्यात, त्यांना दूध कुठून येते माहिती नाही, अशा शब्दात कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणाविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कोल्हापूर- केंद्र सरकार आणि राज्य सरकार लुटारूंची टोळी आहे. दीड पट हमीभाव देण्याची आजपर्यंत सर्वांनी टोलवाटोलवीच केली आहे. आतापर्यंत सर्वच आमदार, खासदारांनी गप्पा मारल्या, आमच्या बायकांना लुगडं मिळेना, पोरांची लग्न हुईनात, पण यांच्या बायका घरात बसून दूध पित्यात, त्यांना दूध कुठून येते माहिती नाही, अशा शब्दात कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणाविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केंद्र सरकारचे कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना मारक असून शेती उत्पादनाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली.