कोल्हापूर -यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल ९२.४२ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागाचा निकाल ५.३० टक्क्यांनी वाढला आहे. कोल्हापूर विभाग निकालात राज्यामध्ये पाचव्या स्थानावरून तिसरा क्रमांकावर आला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. कोल्हापूर विभागातून यावर्षी १ लाख २४ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत १ लाख १४ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे 93.11 टक्के निकाल लागला आहे. सातारा जिल्ह्याचा 92.18 टक्के तर सांगली जिल्ह्याचा 91.63 टक्के निकाल लागला. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 92.42 टक्के निकाल लागला आहे. तिन्ही जिल्ह्यात मिळून 162 केंद्रावर बारावीची परीक्षा झाली.
मुलांपेक्षी मुली अधिक उत्तीर्ण-
दरवर्षीप्रमाणे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांहून अधिक आहे. हे प्रमाण 96.57 टक्के इतके आहे. या परीक्षेत एकूण 55 हजार 814 पैकी 53 हजार 900 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 68 हजार 444 पैकी साठ हजार 569 इतकी मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण 89.01 टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 5.33 टक्क्यांनी वाढले आहे.