महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्याला जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा - पाटबंधारे विभाग - कोल्हापूर पाटबंधारे विभाग

उन्हाळ्यात अगदी जून अखेरपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील धरणात शिल्लक आहे. एप्रिल ते जून या कालावधीत जवळपास जिल्ह्याला ५.२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज भासते. पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये 9.5 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

पाटबंधारे विभाग
पाटबंधारे विभाग

By

Published : Apr 13, 2021, 4:15 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात जूनअखेर पुरेल इतका मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. मान्सूनने पंधरा दिवस उशिरा जरी हजेरी लावली तरी देखील जिल्ह्यातील पाणीसाठा शेतकऱ्यांसह पिण्यासाठी शिल्लक आहे. अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

अभियंता रोहित बांदिवडेकर
मार्चनंतर कडक उन्हाळ्याला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील पाणीसाठा उपशामुळे तसेच तापमानामुळे कमी होतो. ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात किती पाणी साठा शिल्लक आहे ? याचा ईटीव्ही भारत ने आढावा घेतला. उन्हाळ्यात अगदी जून अखेरपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील धरणात शिल्लक आहे. एप्रिल ते जून या कालावधीत जवळपास जिल्ह्याला ५.२५ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज भासते. पण प्रत्यक्षात जिल्ह्यातील पाणी साठ्यामध्ये 9.5 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्वच धरण साठ्यात वाढ झाली होती. पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करून धरणातील पाणी गरजेनुसारच सोडले होते. त्यामुळे यंदा धरणाच्या पाणीसाठा जून अखेर पुरेल इतका आहे. असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितले आहे.
आजवर प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसी मृत साठा सह (उपयुक्त साठा -टीएमसी)
राधानगरी- ४ टीएमसी (३.३०)
तुळशी-२ .२५ टीएमसी(२)
वारणा-१९.७० टीएमसी(१३)
दुधगंगा-११.४० टीएमसी(९.९०)
कासारी-१ टीएमसी
कुंभी-१. २५ टीएमसी
कडवी- १.३० टीएमसी

ABOUT THE AUTHOR

...view details