महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur District Bank Election 2021 : जिल्हा बँकेचा निवडणूक प्रचार शिगेला, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - हिवाळी अधिवेशन 2021

नुकतेच हिवाळी अधिवेशन संपले आणि सर्व नेते जिल्ह्यात आले आहेत. (Kolhapur District Bank Election 2021) यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रचाराला वेग आला आहे. आज (दि. 30 डिसेंबर)रोजी कोल्हापुरमध्ये सत्ताधारी पॅनल छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा मेळावा पार पडला. एकमेकांवर यावेळी आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँक
कोल्हापूर जिल्हा बँक

By

Published : Dec 30, 2021, 8:59 AM IST

कोल्हापूर - हिवाळी अधिवेशन संपले आणि सर्व नेते जिल्ह्यात आले आहेत. यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रचाराला वेग आला आहे. आज (दि. 30 डिसेंबर)रोजी कोल्हापुरमध्ये सत्ताधारी पॅनल छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी आरोपांच्या फैरी एकमेकांवर सुरू होत्या. (Maharashtra Winter Session 2021) शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांना उद्देशून शिवसेनेने मुश्रीफ यांना झोळी फाटेल इतके भरभरून दिले असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी कागलच्या (Kolhapur District Bank Election 2021) जनतेने व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मला भरभरुन दिले आहे. त्यांच्या पाठबळावर माझी झोळी भरली आहे असा पलटवार केला आहे. ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक नेते उपस्थित होते.

व्हिडिओ

आघाडीवरुन गेले काही दिवस आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत

करवीर, गगनबावडा तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक हॉल येथे झाला. याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, (NCP President Sharad Pawar) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, यांच्यासह उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील आघाडीवरुन गेले काही दिवस आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस आमनेसामने आहेत.

कागल च्या जनतेने व शरद पवारांनी मला भरभरुन दिले

मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले असून यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, मी गेली सतरा वर्षे मंत्री आहे.दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी निर्माण झाली. मला आतापर्यंत जे काही भरभरून मिळाले ते कागलची जनता व शरद पवार यांच्यामुळे मिळाले.जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे.जिल्हा बँकेचा विकास हे आपले ध्येय आहे. जिल्हा बँकेच्या ठेवी दहा हजार कोटी पर्यंत वाढविणे व नफा २०० कोटी पर्यंत पोहचवणे या पद्धतीने काम करू.केडीसीसी बॅंक देशात नंबर एक बनवू.

केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, केडीसीसी बँक ही सर्वसामान्य माणसाला आधार देणारी बँक, ही बँक चांगली राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे- वाढली पाहिजे ही आम्हा नेतेमंडळींची नैतिक जबाबदारी. विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारात प्रसंगी आमच्यावर व्यक्तिगत टीका करा.मात्र बँकेचा कारभार चांगला आहे, हेही कधीतरी मान्य करा.अशी खोचक टीका सतेज पाटील यांनी विरोधकांना लगावला.

आंब्याच्या झाडावर दगड मारायच काही लोक काम करत आहेत

शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल उभे केले असताना देखील शिवसेना खासदार धैर्यशील माने. यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी जिल्हा बँकेत सत्ताध्यारणबरोबर गेले यामुळे शिवसेनेने नाराजी दर्शवली होती. मात्र आज मेळाव्यात माजी खासदार निवेदिता माने यांनी विरोधकांना याचे उत्तर दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्य मध्यवर्ती बँक डबघाईला आली होती. त्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँक प्रगती पथावर आणली गेली. बँक उत्कर्षाला गेली.परंतु आता बँकच आंब्याच्या झाडात रुपांतर झाले असून आता या आंब्याच्या झाडावर काही लोक दगड मारायचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका माजी खासदार शिवसेना नेते निवेदिता माने यांनी विरोधकांवर केली. बँकेत गेल्या पाच वर्षांत अनेक शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले आहेत.

हेही वाचा -New Year Celebration Guidelines : नववर्षाच्या स्वागतासाठी गृहविभागाकडून नवी नियमावली जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details