कोल्हापूर -कोरोना आणि ओमायक्रॉन(Omicron virus in kolhapur ) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून आरोग्य यंत्रणा सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेला (Corona third wave) तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या काय उपाययोजना (Preparation Combat of third wave of corona) केल्या आहेत यावर एक नजर..
ऑक्सिजनची परिस्थिती -
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. 185 मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता सध्या उपलब्ध आहे. जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे एकूण 17 प्रकल्प कार्यान्वित होणार होते. त्यातील 14 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शिवाय लिक्विड ऑक्सिजन प्लांट (Liquid Oxygen Plant in kolhapur ) सुद्धा प्रस्तावित होते. त्यातील 7 पूर्ण झाले असून त्याद्वारे 111 मेट्रिक टन ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण केली आहे.
हे ही वाचा -Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर
लसीकरण परिस्थिती -
सद्या जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination in Kolhapur district) सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या वयोगटातील तब्बल 2 लाख 29 हजार मुलांचे लसीकरण होणार आहे. काल एका दिवसात 9 हजार 318 मुलांचे लसीकरण झाले आहेत. मात्र 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा विचार करायचा झाल्यास जिल्ह्यात 1 जानेवारी पर्यंत 30 लाख 14 हजार 400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यातील 27 लाख 77 हजार 200 लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 19 लाख 31 हजार 594 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. जवळपास 70 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र आता ओमायक्रॉनचा धोका तसेच संभाव्य तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पुन्हा लसीकरणासाठी (Vaccination in Kolhapur district) रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज 20 ते 40 हजारांच्या आसपास लोकांचे लसीकरण होईल असे नियोजन सुरू आहे.