कोल्हापूर- कोल्हापूरात खुनाच्या ( Murder ) घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणावरून खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका क्षुल्लक कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात ( Radhanagri ) खून झाल्याची घटना घडलीये. तंबाखुसाठी चुना मागण्यावरून झालेल्या राड्यात, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. अनिल रामचंद्र बारड असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल :
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील धामोड आणि कुंभारवाडी येथील दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री राडा झाला. केवळ तंबाखूसाठी चुना मागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले. या दोघांच्या वादवादीमध्ये एका 47 वर्षीय व्यक्तीला चाकूने भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी रवाना केले गेले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड असे या मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी संशयित आरोपी विकास कुंभार विरोधात राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
चुना मागण्यावरून राधानागरीत राडा; हाणामारीत एकाचा मृत्यू - Kolhapur News
राधानगरी तालुक्यातील धामोड आणि कुंभारवाडी येथील दोघांमध्ये काल शुक्रवारी मध्यरात्री राडा झाला. केवळ तंबाखूसाठी चुना मागण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद तुंबळ हाणामारीत झाले. या दोघांच्या वादवादीमध्ये एका 47 वर्षीय इसमाला चाकूने भोसकले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
हाणामारीत एकाचा मृत्यू