महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेचा खून करत उसाच्या फडात मृतदेह जाळण्याचा प्रयत्न; कोल्हापुरातील धक्कादायक घटना - शरीर सुखाची मागणी

Kolhapur Crime News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. महिलेनं शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं 35 वर्षीय आरोपीनं तिचा खून करत मृतदेह उसाच्या फडात जाळण्याचा प्रयत्न केलाय.

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 8:57 AM IST

Updated : Dec 30, 2023, 9:25 AM IST

कोल्हापूर Kolhapur Crime News : शरीर सुखाच्या मागणीला नकार दिल्यानं गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. धक्कादायक म्हणजे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह उसाच्या फडात टाकून उसाच्या फडाला आग लावत मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही घटना गुरुवारी रात्री आजरा तालुक्यातील भादवण या गावात घडलीय. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय.



रागाच्या भरात केला खून : याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत 42 वर्षीय महिला आपल्या पतीचं निधन झाल्यानं आईसोबत राहात होती. गुरुवारी संशयित 35 वर्षीय आरोपी दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर सदर महिलेला गाठत बाजूला असलेल्या उसाच्या फडात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीनं या महिलेवर बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली. मात्र त्यावेळी महिलेनं त्याला विरोध केल्यानं संशयित आरोपी योगेशनं रागाच्या भरात तिचा खून केला.

मृतदेह जाळण्याचा प्रयत्न : ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदर महिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला. यानंतर उसाच्या फडाला आग लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उसाला आग लागल्याचं कळताच गावकऱ्यांनी विझवण्यासाठी धाव घेतली. आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशिरा या महिलेची ओळख पटली.

सीसीटीव्ही कॅमेरामुळे गुन्हा उघड :ही महिला जळालेल्या उसात कशी गेली, याबाबत संशय व्यक्त करत घातपाताच्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला. यात गुरूवारी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी हा भादवणवाडी मार्गावर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत होता. शिवाय श्वान पथकही त्याच्याच घरात गेल्यानं पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक बळावला. पोलिसांनी संशयित आरोपीला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली असता शरीरसुखासाठी नकार दिल्यानं खून केल्याची कबुली त्यानं दिली. संशयित आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. आता त्याच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

हेही वाचा :

  1. लग्नाच्या बहाण्यानं मुंबईतील महिलेवर राजस्थानात सामूहिक बलात्कार
  2. कामाचे आमीष दाखवून गुजरामध्ये विक्री, बळजबरीने लग्न अन् सामूहिक बलात्कार; तीन लेकरांच्या आईची करुण कथा
  3. दहावीतील बालिकेवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानं खळबळ
Last Updated : Dec 30, 2023, 9:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details