कोल्हापूर -काँग्रेसमधील गळती अद्यापही सुरूच आहे. त्यात भर म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगत आहेत. आज संध्याकाळी राजीनाम्याबाबत आपली भूमिका करणार स्पष्ट असल्याचे आवाडे यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर : काँग्रेसच जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे देणार पक्षाला सोडचिठ्ठी? - कोल्हापूर राजकारण
काँग्रेसमधील गळती अद्यापही सुरूच आहे. त्यात भर म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगत आहेत. आज संध्याकाळी राजीनाम्याबाबत आपली भूमिका करणार स्पष्ट असल्याचे आवाडे यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे
सहा महिन्यांपूर्वीच आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. आगामी विधानसभेसाठी इचलकरंजी मतदारसंघातून प्रकाश आवाडे इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आवाडे यांना विरोध असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आवाडे यांनी सोडचिठ्ठी दिल्यास कोल्हापुरात काँग्रेसला मोठ्ठा धक्का बसू शकतो.